माजी लोकसभा सदस्याला मृत्यूनंतर मिळणार सन्मान

Foto
माजी लोकसभा सदस्याचे निधन झाल्यास प्रशासकीय अधिकार्‍यांनी पुष्पचक्र वाहावे, असे निर्देश राज्याच्या राज्य शिष्टाचार विभागाने नुकतेच दिले. याबाबत लोकसभा सहसचिव यांनी 17 जून 2020 रोजी पाठविलेल्या पत्राचा आधार घेण्यात आला आहे. माजी लोकसभा सदस्यांचे निधन झाल्यास तहसीलदार अथवा समकक्ष अधिकार्‍यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.